
‘नरगिस आँटीने कहाँ था, चिंटू तुम अगर ठीकसे चलकर आये.. तो मै तुम्हे चॉकलेट दुंगी!’ प्यार हुआ इकरार हुआ या गाण्यात जी तीन मुलं दिसतात त्यातला सर्वात लहान ऋषी कपूर आहे. आपण त्या गाण्यात कसे आलो हा किस्सा ऋषी कपूर यांनीच एका मुलाखतीत सांगितला होता. ‘श्री ४२०’ सिनेमातलं हे गाणं हिट झालं.